एकदम अचानकपणे जर एखादा साधू किंवा कोणी माणूस आपल्यापुढे येऊन आपल्याबद्दल काही, किंवा आपले भविष्य वगैरे, सांगायला लागला तर बहुतेक वेळेला, हा माणूस आपल्याकडून पैसे काढण्यासाठी असं काहीतरी करत असावा, असं आपण मनातल्या मनात लगेच ठरवतो, आणि त्याला टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक वेळेला ते अनुमान बरोबरच असतं. कारण,असे अनेक कुडमुडे ज्योतिषी, जनरल, सगळ्यांच्या बाबतीत खरं असू शकेल, असं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण तिथून निघून जरी गेलो, तरी थोडावेळ आपलंही कुतूहल चाळवलं जातं, ह्यात मात्र कुठलीही शंका नाही.
कधी कधी, आपण गम्मत म्हणून त्याचं बोलणं ऐकून, स्वतःचं मनोरंजनही करून घेतो. ह्याविषयी विविध प्रकारची मतं जरी असली, तरी,भविष्यात काय होणार, हे जाणून घेण्याची इच्छा, बहुतांश व्यक्तींना असते, असा माझा अनुभव आहे.
मी अश्याच एका साधूचा मला आलेला अनुभव तुम्हाला सांगणार आहे.
ही हकीकत १९९४ सालची. मी त्यावेळी मेडिकलच्या पहिल्या वर्षाला होते. दुपारची वेळ. कल्याणच्या घरी, मी आई आणि सुगंधा, तिघीजणी होतो. खाली काहीतरी आवाज ऐकू आला म्हणून खिडकीतून पाहायला गेलो. पाहिलं तर गजानान महाराजांची पालखी आली होती. माझी आई गजानान महाराजांची भक्त. ती म्हणाली "दोन वाट्या साखर काढ जा, मी जरा खाली जाऊन नमस्कार करून येते", आणि ती लगेच, जरा साडी सारखी करून, निघाली.
ती दारातच होती, इतक्यात त्या पालखीतलेच एक साधू बाबा आमच्या दाराच्या समोर आले. आई मला म्हणाली, "साखर ह्यांना दे, मी येतेच नमस्कार करून". मी बरं म्हणून साखर काढलेली ताटली आणली. आई निघायच्या आधी, ते साधू बाबा आईला म्हणाले, “ह्या ताईचं लग्न होणार पुढच्या वर्षी”,आई जरासं हसली आणि खाली गेली.
घरात आम्ही दोघी होतो. मी त्या साधू बाबाना साखर दिली आणि आत वळून दार लावणार, इतक्यात त्या बाबांनी, "प्यायला पाणी मिळेल का"?, असं विचारलं. मी सुगंधाला दारात उभं राहायला सांगितलं, व तांब्या भांडं आणायला आत गेले. ते बाबा, तिथेच दारात खाली बसले व सुगंधाशी माझ्याबद्दल बोलायला लागले. ते तिच्याशीही माझ्या लग्नाबद्दलच बोलत होते.
मी पाणी आणल्यावर त्यांनी परत त्यांचं बोलणं सुरु केलं “तुला शोधत नवरा येणार, त्या माईला घर बसल्या जावई मिळणार”.
एक दोन वेळा ऐकून घेतलं, वयाचा मान, म्हणून सोडून दिलं, पण परत परत, तेच तेच ऐकून, मी वैतागले. ह्या साधूला बहुदा नुसत्या दोन वाट्या साखर पुरेशी नसावी, असा विचार मनात आला. त्याने आता निघून जावं, असंही वाटलं. पण त्यांचं उठण्याचं काही लक्षण दिसेना, ते दारातच बसले होते आणि परत परत माझ्या लग्नबद्दल बोलतच होते. त्यावेळी मी फक्त वीस वर्षाची होते, शिकत असल्यामुळे लाग्नाबिग्नाचा तर प्रश्नच नव्हता. शेवटी जरासं वैतागून मी त्यांना म्हंटलं, "बाबा मला लग्न नाही करायचं इतक्यात","अजून ३ वर्ष माझं शिक्षण आहे शिल्लक", “मग कसं होईल लग्न पुढच्या वर्षी” ?
त्याच्यावर ते जरा हसले आणि म्हणाले, "ते तुझ्या हातात नाही ताई. मी काय सांगतो ते ऐकून ठेव".
इतक्यात खाली गेलेली आई परत आली. मी इरीटेट झालेच होते. “जाऊदे, आई बघेल काय ते”, असा विचार करून मागे सरकले.
ते बाबा परत बोलायला लागले.
आई म्हणाली, “बाबा, आमचा भविष्य वगैरे गोष्टींवर विश्वास नाही, तुम्हाला साखर दिली ना, या आता तुम्ही”.
ते म्हणाले "निघालो माई, पण जे सांगायचंय ते सांगून जातो". "ह्या ताईचं पुढच्या वर्षी लग्न होणार. मुलगा तुझ्या घरी चालून येणार, ती लक्ष्मी आहे, तिने बापाची भरभराट केली, तशी ती नवऱ्याची पण भरभराट करणार, वेगवेगळ्या घरात राहणार, खूप चांगले आयुष्य जगणार, तिला पुत्र प्राप्ती होणार. सासरच्या घरी सगळे तिला मान देणार. शिक्षण पूर्ण होणार, मात्र, मधे थोडी अडचण येणार. नवऱ्याच्या घरावर, मनावर राज्य करणार. हिचा नवरा त्याच्या आईवडिलांपासून लांब राहणार, पण तुमच्या जवळ. नंतर मात्र ती परदेशात जाणार”."ताई तुला खूप आशीर्वाद". "बरंए माई, येतो मी", असं म्हणून ते उठू लागले.
आम्ही जराश्या आवाक स्थितीत होतो, ह्याच्यावर काय बोलावं, करावं काही सुचेना, पण माझ्याबद्दल खूप चांगलं बोलल्यामुळे,आईने त्या साधूला एकवीस रुपये दिले. मग ते साधू बाबा निघून गेले.
आई आणि सुगंधा दोघीही मला, "जाऊदे गं, असं कोणी म्हंटलं म्हणून लगेच काही होतं का? आणि झालं, तरी, वाईट काही होईल, असं त्यांनी काही म्हंटलं नाहीये, तू नको उगीच विचार करू. जा तू तुझा आभ्यास कर",असं म्हणून कामाला लागल्या.
नाही म्हंटलं, तरी थोडा वेळ मनात त्यांच्या बोलण्याचा विचार करत होते.
मग जरासं तडकूनच, मी म्हंटलं "गम्मत आहे बाबा, काय माणसं असतात एकेक!!." "ह्या पैकी काहीही होणार नाहीये". "मी पुढच्या वर्षी लग्न करणार नाहीये, कोणी मुलगा येणार नाहीये, शिक्षणात खंडाचा तर प्रश्नच नाही,आणि परदेशात मी आयुष्यात कधीही जाणार नाही, कारण मला भारत सोडून, भारत काय, मुंबई सोडून कुठेही राहायचं नाहीये".
माझ्या ह्या बोलण्यावर दैव मात्र हसत होतं. अजिबात शक्य नसलेलं, साधू बाबांनी वर्तवलेलं, माझ्या बाबतीतलं भविष्य, तंतोतंत खरं झालं.
१९९५ साली, साधन मुखर्जी ह्यांनी, वसईला, स्वतःची जागा घेतली. आमची मैत्री होती, पण माझं शिक्षण झाल्याशिवाय लग्नाचा विचार नव्हता. वसईला जागा घेतल्यावर आम्हाला सारखे भेटणे शक्य होत नव्हते. मग त्यांच्या मनात लग्न लवकर करायचा विचार आला. मनात विचार आला कि तो लगेच पार पडायचा, असा स्वभाव असल्यामुळे, स्वतःच्या घरी सुद्धा न बोलता,त्यांनी आईला भेटून, माझ्याशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली.
मोठ्या माणसांचा, नंतर लग्न करण्याचा, सल्ला त्यांनी ऐकला नाही, आणि त्यावर्षी, काहीही ठरलेलं नसताना, अचानकपणे माझं लग्न झालं. साधू बाबांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा स्वतःच्या पायांनी चालून आला, आईला जावई शोधावा लागला नाही. पुढील दोन तीन वर्षात साधनची, खरच,भराभर प्रमोशन मिळून, भरभराट झाली. ९७ साली, मला मिताली झाल्यामुळे, माझ्या शिक्षणात, सहा महिन्याचा खंड पडला. सोळा वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी, म्हणजे सहा नोव्हेंबरला मला मुलगी झाली, त्याच दिवशी माझा पेपर होता, तो पेपर मी नंतरच्या, मे महिन्यातल्या परीक्षेत सोडवला. पुढे ५ वर्षांनी पुत्र प्राप्तीही झाली.
मी शिकलेली, हुशार, गोरीपान, दिसायला चांगली, सुगरण, माणसं जोडणारी अशी आहे, असं माझ्या सासरच्या मंडळींचं मत आहे. खर, खोटं आपल्याला माहित आहेच. तर, सासरी, मला भरपूर मान आहे.
नवऱ्याच्या मनावर, घरावर मी राज्य करत्येय.आमची भरपूर भांडणं होत असली, तरी आमच्या दोघांच्याही मनात, एकमेकांबद्दल आदर आहे.
आम्ही कलकत्त्याला राहत नसल्यामुळे, खरंच माझा नवरा, त्याच्या आईवडिलांपासून लांब राहिला. पुढे माझ्या मुलांना सांभाळण्य़ाकरता माझ्या आईने व बहिणीने वसईला राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमची आधीची जागा विकून, शेजारी शेजारी जागा घेतल्या. त्यामुळे तो माझ्या माणसांच्या जवळ राहिला.
नंतर, आम्ही मुंबईत, ऑफिस जागा देत असल्यामुळे, ७ जागा बदलल्या. आमची सर्व घरं, अतिशय सुरेख होती. पुढे नोकरी निमित्ताने, परदेशी बदली झाल्यामुळे, मला परदेशातही यावं लागलं आहे. इथेही माझं घर सुंदर आहे. गेली सहा वर्ष मी इथे राहते आहे.
खरं होणे शक्य नाही, असं मानलेलं, साधूबाबानी वर्तवलेलं आतापर्यंतचं, सगळं खरं झालं.
पुढचं जाणून घेण्याकरता, ते साधूबाबा भेटण्याची, मी वाट पाहत्येय. अतर्क्य असा अनुभव आहे हा, पण माझ्या बाबतीत घडला असल्यामुळे, तो शंभर टक्के खरा आहे, हे मी शपथेवर सांगू शकते.
अशक्य वाटणारं, पण खरं ठरलेलं असं भविष्य कथन करणाऱ्या, नाव सुद्धा माहित नसलेल्या त्या साधू बाबांना माझ्या मनात विशेष स्थान आहे, म्हणून त्यांच्या गोष्टीचा, सोनालीच्या मनातल्या गोष्टींमध्ये समावेश….……
तुम्हाला आलाय का असा काही अनुभव? आला असेल तर जरूर शेयर करा………

No comments:
Post a Comment