आम्ही सिंगापूरला नवीन राहायला आलो, तेव्हा काही दिवसांनंतरची गम्मत. मी घरी, पाव भाजी बनवायचं ठरवलं. सगळं साहित्य जमवून, जोरदार चिराचिरी करून पावभाजी तयारही केली. मग हे आणि मी बेकरीत पाव आणायला गेलो. पाव घेऊन घरी आलो. कांदा,लिंबू चिरून, मस्त ...अमूल बटरवर पाव भाजून सगळी तयारी केली. सगळेजणं जेवायला बसलो. मस्तपैकी भाजलेल्या पावाचा तुकडा भाजीला लावून तोंडात घातला. बाकी लोकांनीही माझ्यासारखाच पावभाजीचा समाचार घ्यायला घास तोंडात घातला, आणि एकाच वेळेस सगळ्यांनी तोंडं वाकडी केली. का माहित्येय? आम्ही, गोड पावाबरोबर, पावभाजी खाल्ली होती. आपल्या मुंबईतल्या पावा सारखेच दिसणारे, इथल्या बेकरीतले पाव, चक्क गोड होते.
गोड पावाबरोबर त्या भाजीची चव इतकी विचित्र लागत होती कि आम्ही शेवटी ते पाव उचलून ठेऊन दिले व स्लाईसब्रेड, बटर लावून भाजून, त्याच्या बरोबर भाजी खाल्ली. मस्त मेजवानीचा साडेसत्यनाश झाला. सगळ्यांचा झालेला विरस माझ्या फारच मनाला लागला. मग काही दिवस मी पावभाजी केलीच नाही.
त्यानंतर, मग आम्ही वेग वेगळे पाव घरी आणून, खाऊन बघण्याचा सपाटा लावला. सगळ्याच पावात साखर असायची. हा शोध सुरु असताना, आम्हाला फ्रेंच लोफ नावाचा पाव, साखरे शिवाय असलेला मिळाला. मग आम्ही तो लांब लचक पाव आणून त्याचे तुकडे करून पावभाजी बरोबर बरेच दिवस चालवून घेत होतो. पण हा पाव फारच कडक असल्यामुळे माझ्या मुलांना तो विशेष आवडायचा नाही.
थोडक्यात, अयोग्य पावांनी, कट करून आमचा पावभाजी खाण्यातला आनंद, अगदी अगदी हिरावून घेतला होता.
तीच गोष्ट पिझाबेसचिही…. मुंबईत मिळतात तसे, इथे बेकरीत पिझाबेस मिळत नाहीत. कोल्ड स्टोरेज नावाच्या दुकानात, पिझाबेस मिळतो, पण त्याच्यात ब्रेड इम्प्रुव्हर आणि प्रिझरव्हेटिव्ह असल्यामुळे, मला तो मुलांना द्यायला आवडत नाही.
मग 'गरज ही शोधाची जननी' ह्या उक्ती प्रमाणे मी पाव ह्या विषयावर खूप संशोधन केलं. पहिल्यांदी ब्रेड मेकर विकत घ्यावा असा विचार केला. माझ्या एका मैत्रिणीने तो घेतला होता. तिला त्याचा अनुभव फार छान आला नाही. मग मी ते महागडं मशीन घेण्याचा विचार सोडून दिला.
मग,समस्या सुटत नाही म्हंटल्यावर, सिंगापूरमधे, ब्रेड तयार करण्याच्या क्लासचा शोध सुरु केला. क्लास सापडला, एक दिवस सहा तास अश्या चार दिवसाच्या क्लासची फी, चारशे डॉलर होती. ह्यांच्याकडून प्रपोसल ओ. के. करून घेतलं व क्लास लावला.
क्लासमधे आम्हाला सोळा प्रकारचे ब्रेड करायला शिकवले. त्यांच्याही सगळ्या पावांमध्ये साखर होती. मग स्पेशल रिक़्वेस्ट करून बिना साखरेचा पाव बनवायलाही शिकले.
अजूनही अडचणी मात्र संपल्या नाहीत. क्लास मध्ये पाव बनवताना आम्ही डोह मेकर नावाचं मशीन वापरून पाव बनवण्यासाठी, मैद्याचा गोळा तयार करायचो. हाच गोळा हातानी मैदा मळून बनवल्यास, पाव तितकेसे चांगले होत नाहीत असे लक्षात आले. मग ह्यांच्या मागे लागून नऊशे ऐशी डॉलरचं डोह मेकर आणि सातशे डॉलरचं मोठं डीजीटल ओव्हन, विकत घेतलं. मग घरी, स्वतः, एकदम प्रोफेशनल असे पाव बनवले.
आता मी वेगवेगळ्या प्रकारचे पाव, बेकरीत मिळतात त्याहीपेक्षा सरस, घरी बनवू शकते.
हे जरी असलं, तरी मी अट्टाहासाने, कैक जास्त पैसे खर्च केले, असं माझ्या मनात सारखं येत राहिलं, आणि मी ह्यांना म्हंटलं, "मी एक स्त्री आहे ह्याचा मला, खूप आनंद होतो, कारण मी जर पुरुष असते तर माझ्या सारख्या चक्रम बाईला सहन करणे, मला किती कठीण पडले असते ह्याची मला जाणीव आहे. सहा आठ रुपयाला एक लादी, अश्या मिळणाऱ्या त्या पावांकरता, मी दोनेक हजार डॉलर खर्च केले. मी अगदी आयुष्यभर घरी पाव बनवले तरी इतके पैसे वसूल होणार नाहीत”.
मी असं म्हंटल्यावर, ह्यांनी मला,”तू उत्तम तयार झालेल्या, पावांचा ट्रे जेव्हा ओव्हन मधून बाहेर काढलास, तेव्हा तुझ्या आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, मी कैक हजार डॉलर कमवले”. “तू खर्च झालेल्या पैशांचा विचार करणं सोडून दे”.“प्रत्येक गोष्टीतून वाईट शोधण्याच्या ऐवजी, त्यातून चांगलं काय झालं, हे शोधलस, तरच आयुष्यात आनंदी होऊ शकशील”,असं उत्तर दिलं.
केवढी मोठी गोष्ट, किती छोट्याश्या प्रसंगातून, साध्या शब्दात त्यांनी मला शिकवली. अश्या वेळेसना, ते मला खूप खूप ग्रेट वाटतात. I am lucky that he is my husband, असं मनात आल्यावाचून रहात नाही.
पैसा, हे आनंद मिळवण्यासाठीचं, एक साधन आहे, साध्य नाही. ही महत्वाची गोष्ट, आपण सर्वांनी लक्षात ठेवली तर जीवनात जास्त आनंदी होऊ शकू, हेच दाखवणारी आजची गोष्ट. म्हणून ह्या छोट्याश्या पावाच्या गोष्टीचा, आणि माझ्या मिस्टरांच्या मोठ्ठ्या मनाचा उल्लेख, सोनालीच्या मनातल्या गोष्टींमध्ये …………

No comments:
Post a Comment