मी आत्तापर्यंत वाचलेल्या मराठी पुस्तकांमधे मला सर्वात जास्त आवडलेली, मनात खोलवर घर करून बसलेली कादंबरी म्हणजे श्री. ना. पेंडसे ह्यांची "तुंबाडचे खोत", असं मला अगदी ठामपणे, सहज म्हणता येईल.
तुंबाडचे खोत हि एक द्विखंदी, तब्बल १३५८ पानं असलेली महाकाय कादंबरी. ह्या कादंबरीतल्या चार पिढ्यांच्या इतिहासाची नवलकथा ब्रिटीश आमदनीच्या पहिल्या दशकात सुरु होते आणि ब्रिटीश आमदनीच्या शेवटच्या दशकात संपते. संपूर्ण कथेत, खोतांचा वाडा, चार पिढ्याचा प्रवास पाहत, ठामपणे उभा असलेला आपल्याला दिसतो. हा वाडा, वैभव, दारिद्र्य, प्रसिद्धी,निंदानालस्ती, मंगल प्रसंग, अमंगल अघोरी उद्योग,असे अनेक चढउतार त्या चारशे वर्षात पाहतो. तुंबाड गावात हा वाडा सतत चर्चेत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा वाडा ऐश्वर्य आणि दारिद्र्य ह्यांची स्थित्यंतरं पाहतो.
पुरुषभर उंचीचा चौथरा असलेला, लांबलचक पायऱ्या चढून जावा लागणारा, प्रशस्त ओटी असलेला,काळवत्री दगडांचे उंच खांब असलेला, सर्वत्र सागवानी लाकडाचा वापर असलेला, हा भारदस्त वाडा, नवीन लग्न होऊन सासरी आलेल्या गोदाला, अंगावर चालून आलेल्या धुडा सारखा भासतो.वाड्याशी संबंधित सर्व मंडळीना, वाड्याबद्दल अत्यंत जिव्हाळा असलेला आपल्याला दिसतो. कादंबरीतील इतर पात्र, जेव्हा दुसरीकडे वास्तू उभारण्याच्या प्रयत्न करतात, तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांचे प्रेरणास्थान, तुंबाडचा वाडा, हेच असते. मात्र प्रत्येकजण नवीन वस्तू तुंबाडच्या वाड्याच्या तुलनेत थोडीशी कमी भरेल ह्याची दक्षता घेताना दिसतो.
तर, चारशे वर्ष वय असलेल्या, मूळ पुरुषाचे, मोरयाचे हात लागलेल्या, हुंड्या झुंबरांनी सजलेल्या, अलौकिक अश्या ह्या वाड्यात, राहणारी माणसंही, अत्यंत विलक्षण अशी. विविध स्वभाव असलेली अनेक माणसं.
श्री.ना.पेंडसे ह्यांची लेखणी इतकी प्रगल्भ, कि पुस्तक वाचताना, आपण ह्यातले मग्रूर, रगेल, रंगेल असे दादा आणि बंडू खोत, शामळू नाना खोत, धीरगंभीर, अत्यंत विचारी, अप्रतिम सुंदर, अशी गोदा, मावश्या, काकू, अतिशय शांत मुद्रा असणारे, विलक्षण बुद्धिमान असे गणेश शास्त्री, उर्मट जनापा, कुटील जुळे चिमापा आणि भिकापा, वाघाची शिकार करणारा बजापा, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी, मुंबईची श्रीमंत जुलाली,नवरा बेपत्ता झाल्यामुळे परत आलेली ताई, लिंबाडला वेगळे घर थाटणारा नाना खोत, त्याचा मुलगा मधु, पुढच्या पिढीत अत्यंत हुशार आणि व्यवहारी असा नरसू, प्रेमात अपयश येणारा अनंता, भंडाऱ्याशी दुसरं लग्न करणारी तारा, अत्यंत कणखर अशी श्रीमती, ह्या सर्व पात्रांबरोबर त्यांच्यातले एक होऊन घडणाऱ्या गोष्टींचे साक्षीदार बनतो.
संक्षिप्त कथानक सांगायचं म्हंटलं, तर, वैभवात लोळणारे, माजलेले दादा खोत आणि बंडू खोत अघोरी पंथाची साधना करतात, याचा अनपेक्षित शोध त्यांच्या धाकट्या भावाला म्हणजे नाना खोताला लागतो. अघटित काहीतरी घडतंय अशी कल्पना आल्यामुळे, लपत-छपत चोरटेपणाने, बंद असलेल्या खोलीत तो शिरतो, तिथे त्याला विद्रूप-ओंगळ,असं बरंच काही दिसतं. भीतीदायक अशी देवीची ओबडधोबड मूर्ती, गांजा भरलेल्या चिलमी, माणसांच्या मणक्यांची माळ, हाडं, कवटय़ांमधून ठेवलेले विचित्र पदार्थ, हे बघून भेदरलेला नाना खोत दुसऱ्या दिवशीच भावांपासून वेगळा होतो. खोतांची 'लिंबाड'ला दुसरी शाखा सुरु होते.
गावात वझ्या भट नावाच्या एका म्हाताऱ्याचा खून होतो, त्याचा संबंध खोतांशी जोडला जातो. पोलिस घरी येउन अघोरी प्रकारांसाठी वापरात असलेली खोली झडती साठी उघडतात. वझ्या भटाच्या, खुनाच्या आरोपावरून,खोताना अटक होते. मग त्या प्रकरणात खोतांची सगळी मग्रुरी, रग, खच्ची केली जाते. 'बंडू खोत' परांगदा होतो. 'खैराचं झाड' असं वर्णन असणारा, तांब्याच्या कांबीसारखा ताठ, तजेलदार कृष्णवर्णावर सोन्यामोत्याचे दागिने भूषवणाऱ्या, दादा खोताची पार रया जाते. मग्रुरी जाऊन चेहरा बापुडवाणा होतो आणि वाडय़ाचं सगळं वैभव नाहीसं होतं. सोनं-नाणं काहीही शिल्लक राहत नाही. पोलिसांच्या भीतीने गडी निघून जातात.खोतांच्या समोर उभं राहण्याची पात्रता नसलेली माणसं खोतांना अरे तुरे करू लागतात . काही मंडळी खोतांच्या जमिनी कमी किमतीत लाटतात. गाई-गुरांविना गोठा सुना होतो. वाडा ओस पडतो आणि मग वैभव मिरवणारा वाडा, भकास झालेल्या रुपात आपल्या सामोर येतो. एक पूर्ण तप, तुंबाडचा वाडा, हे भकासपण काढतो.
ह्या काळात दादा खोताची बायको, गोदा समर्थपणे, वाड्याचं वैभव परत येण्याची वाट पाहत, नेटाने वाड्यात राहते.
वाड्याचे वैभव दादा खोत व गोडाचा मुलगा, गणेश परत आणतो. काशीला जाऊन, प्रकांड पंडित आणि उत्तम हाथ गुण असलेला वैद्य बनून येतो. गणेशचं, गणेशशास्त्री तुंबाडकर असं रुपांतर होतं आणि वाड्यावर सुवर्ण युग सुरु होतं. वाडय़ाला परत झळाळी प्राप्त होते. धर्म, गरीब-श्रीमंत, लहान-थोर, न पाहता, गणेशशास्त्री, सर्वांचे जीवनदाते बनतात. वाडा पावन होतो.
त्याला तीर्थक्षेत्रासारखी प्रतिष्ठा लाभते.
पुढील पिढीत गणेश शास्त्र्यांच्या चार मुलांच्या जीवनातील उतार चढाव पाहायला मिळतात. त्यांच्या मुलीच्या लग्नाची वाताहत झाल्यामुळे, ती वाड्यावर वाड्यावर परत येते. वाड्यावर भावांचे उद्योग पाहून विलक्षण दुखी होते. भाचराना सांभाळायचा प्रयत्न करते. हा प्रवास वाचताना आपण त्यात संपूर्ण गुरफटून जातो.
वाड्याच्या प्रत्येक खोलीला इतिहास आहे. ओटी, दिवाणखाना, दक्षिणीची खोली, गोठा,वझेकाकांचं भूत वावरणारा 'जिना', वापरून गुळगुळीत झालेल्या ओटीच्या 'पायठण्या', अघोरी पंथाचं किळसवाणं दान मागणारी 'विटाळाची खोली', बायकांची हितगुजं ऐकणारी 'टेंभुर्णीची खोली', विश्रामला गुरासारखं बडवलेलं पाहणारा 'चौक', खोताची 'छपरी पलंगाची खोली, वाडय़ाच्या पिछाडीला असलेली 'वपनाची खोली’ ह्या सर्वांमध्ये, प्रत्येक खोलीत आपण स्वतः फिरून येतो. त्यातून फिरताना काही प्रकाशमान, काही काळोख्या, काही सुखावणाऱ्या, काही सलणाऱ्या गोष्टी आपण स्वतः अनुभवतो..
लिंबाडचा वाडाही तुंबाडसारखाच! ही तुंबाडची धाकटी पाती. दिलदार, माणसांची कदर करणारी, दुसऱ्यांचे संसार उभारून देणारी. इथे दीलदार नरसू खोताचं राज्य पाहायला मिळतं. नरसू हा वेगळ्या झाल्येल्या नाना खोताचा नातू. हा सदैव, आयुष्य भर, तुंबाडकरांची खरकटी निस्तरतो. तुंबाडकरांकडून मात्र त्याला शिव्या सोडून काहीही मिळत नाही. त्यात अपवाद बाजापाचा. गणेश शाश्त्रींचा तिसरा मुलगा.त्याचं नरसूशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असतं. ह्या नात्यातून पुढे आणखीन काही नाती उलगडत जातात. कशी? ते फक्त पुस्तक वाचून अनुभवता येऊ शकतं. जुलाली, अनंता, तारा, देहाडराय, बापू वकील ही सर्व पात्र, पात्र नसून खरोखरच कुठेतरी अस्तित्वात असतील असं सतत वाटत राहतं.
नारळी-पोफळीची डुलणारी झाडं, जगबुडी नदीची कमनीय वळणं, त्यावरचा ओटी भरण्याचा धक्का, हरण टेंभा, मोरयाचं पाऊल, सुगंधी फुलांची झाडं, गावाला लागून असणारी घनदाट जंगलं अशा भोवतालच्या कोकणच्या निसर्गाच्या कोंदणात जडवलेली हिरे-माणकं,आपल्याला वाचताना श्रीमंत झाल्याचं फिलिंग देतात.
तुंबाडच्या वाडय़ाचा शेवट मात्र हृदयद्रावक होतो. गांधी वधानंतर जे जळिताचं तांडव होतं, त्यात वाडय़ाचा बळीजातो. ताई, गणेश शाश्त्रींची मुलगी, ठामपणे उभी राहून, 'गणेशशास्त्री तुंबाडकरांची मुलगी मेल्याशिवाय वाडा मरणार नाही', असे म्हणून स्वतःचे समर्पण करते. चारी बाजूंनी लपेटणाऱ्या ज्वाळांत ती सती जाणाऱ्या साध्वीसारखी शांत उभी राहते. उंबऱ्यावर त्या पुण्याईचा कोळसा होतो. पण तरीही वाडय़ाच्या काही भागांपुढे अग्नीचंही काही चाललं नाही,आणि उरात धडकी भरवणारं भेसूर भग्न लेणं शिल्लक उरतं.
पुस्तक वाचून संपल्यावर सुद्धा, आपण पुढील काही काळ, तुंबाडातच अडकून पडतो. त्यातून बाहेर पडायला प्रयत्न करावे लागतात.
प्रत्येक मराठी वाचकांनी आवर्जून वाचावी अशी, कोकण आणि त्यातल्या माणसांची ओळख करून देणारी, ही कादंबरी माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. ह्या अतिशय भव्य दिव्य अश्या कादंबरीच्या लेखकाला साष्टांग प्रणिपात.
समृद्ध मराठी साहित्याचा अविष्कार असलेल्या ह्या कादंबरीचा, सोनालीच्या मनातल्या गोष्टींमध्ये, अत्यंत मनपूर्वक समावेश……

फारच सुंदर परीक्षण लिहीलं आहे. मी स्वत:ही ह्या कादंबरीने अनेकदा झपाटून गेलो आहे. अनेकदा अशासाठी की मी त्याची अनेक पारायणे केली आहेत. आणि तरीही हे पुन:पुन्हा वाचावंसं वाटतं. श्री. ना. पेंडसे स्वत: कोकणी आणि त्यांचं कोकणातल्या माणसांचं चित्रण फारच नेमकं असतं. कोकणातल्या मुख्यत: ब्राह्मणी संस्कृतीचा परिचय त्यातून चांगला होतो. लोकांची भाषा, विचार करण्याची पद्धत, आयुष्यातील श्रेयस काय ते ओळखू शकण्याची क्षमता आणि तरीही पांढरपेशा क्षुद्रतेमध्ये रमण्याची तऱ्हा, अल्पसंतुष्ट वृत्ती, माणसांचा खुजेपणा आणि अपवादाने दिसणारी श्रेष्ठता, हे सारेच फार सुंदर पद्धतीने पेंडसे रंगवतात. त्यांच्या इतर कादंबऱ्या (रथचक, हद्दपार, हत्या, कलंदर, ऑक्टोपस, गारंबीचा बापू, लव्हाळी, इ.) मध्येही ही कोकणी माणसांची रेखाटने अप्रतिम आहेत, पण तुंबाडचे खोत मध्ये त्याचा कळस झाला आहे.
ReplyDeleteह्या कादंबरीत विश्राम ह्या पात्राचा वारंवार उल्लेख येत राहतो, अगदी कंटाळा येईपर्यंत. पण त्याचे एक कारण आहे. बाकीच्या लोकांचा क्षुद्र व्यवहारीपणा कायमच अधोरेखित करण्यासाठी त्याचा वापर केला आहे असे वाटते. ह्याचा परिणाम ताई वर आणि नरसू खोतावर सर्वाधिक होतो असे दिसते. नरसू ने पुढे गांधीजींच्या चळवळीत सामील होणे, तुरुंगाच्या वाऱ्या करणे, आणि अखेर त्यातच त्याचा अंत होणे, हे एका परीने त्याने स्वत:च्या स्वार्थी, व्यवहारी, व्यभिचारी आणि तरीही परोपकारी आणि चांगल्या अर्थाने यशस्वी असलेल्या आयुष्याचीही लाज वाटून घेतलेले प्रायश्चित वाटते.
ह्या कादंबरीमध्ये व्यभिचार ह्या गोष्टीला मोठे स्थान आहे. किंबहुना बऱ्याच घटना आणि प्रवाह त्याच्याशी निगडित आहेत. बजापा-जुलाली हे प्रकरण सर्वाधिक महत्वाचे आहेच आणि त्याची संपूर्ण कथानकावर छाया आहे. पण ह्या खेरीज जवळपास प्रत्येकाचे (काही अपवाद सोडून) विवाहबाह्य संबंध असलेले दिसतात. त्याचे फारसे कुणाला काही वाटतही नाही. जुलाली च्या पैशाने श्रीमंत झालेल्या बजापा ने गावात अनेकांवर उपकार करणे, त्याच्या भावांवर उपकार करणे, शाळा काढणे ह्या सगळ्यामुळे त्याचा जो उदोउदो होतो, त्यात - मुळात हे द्रव्य मिळवण्यात त्याची कुठलीही कर्तबगारी नाही, हा एका धंदेवाईक स्त्रीने त्याच्यावर उधळलेला पैसा आहे, आणि म्हणून तो डागाळलेला आहे, ह्याची जाणीव पेंडसेंनी कादंबरीत नीट मांडलेली नाही, हा एक मला खटकलेला मुद्दा. नीतिमत्तेची तीव्र जाणीव असलेली पात्रेही ह्या कादंबरीत आहेत, परंतु हा मुद्दा प्रभावीपणे मांडला जात नाही.
ह्या कादंबरीतील नरसू खोत ही सर्वात ताकदवान व्यक्तिरेखा आहे. एका मर्यादित अर्थाने तो नायक आहे असेही म्हणता येईल. मात्र ४ पिढ्यांची कथा असल्याने ही मर्यादा येते. असा हा नरसू खोत, जो एरवी अत्यंत नीतिमान माणूस आहे, तोही व्यभिचारापासून मुक्त नाही. तेव्हा एका अर्थी व्यभिचार हाच मानवी स्वभावाचा मूळ गुण असून त्याहून वेगळे काही हेच अपवादात्मक समजावे असा काहीसा सूर लेखकाचा दिसतो.
असो. बरेच लिहीता येईल. सध्या मी पुन्हा ही कादंबरी वाचतो आहे. त्यावर नेट वर काही मिळते का म्हणून शोधल्यावर हे परीक्षण सापडले, आणि मला आवडले. ह्यावर अधिक चर्चा करायलाही आवडेल. कळावे.
Mi hi kadambaree 10th nantar vachali hoti. Just loved it. It details the intricacies of relationships and personalities very well. Planning to read it all over again :)
ReplyDeleteUttam parikshan, pan ek sandarbha chukla. Gandhi hatya mhana, vadh navhe
ReplyDeleteमाझ्याकडील तुंबाडचे खोत खंड 1 मधील शेवटची 4 पाने गहाळ झाली आहेत. तुमच्या कडील पुस्तकाच्या त्या चार पानाचे फोटो काढून मला पाठवले तर फार उपकार होतील।
ReplyDeleteमाझा whatsapp नं 9320399850 आहे