Sunday, 20 October 2013

Atharvashirsha

आज सकाळी उठल्यावर मनात विचार आला आता हळू हळू गणपतीच्या तयारीला लागायला हवं आणि गेल्यावर्षी घडलेल्या एका गोष्टीची आठवण झाली.

गेल्या वर्षीच्या गणपतीच्या वेळेची गोष्ट. आदित्यच्या शाळेत गणपती च्या निम्मिताने स्पेशल असेम्ब्ली अरेंज केली होती. आदित्य इथल्या Indian International School मधे जातो. हे मुद्दामसांगण्याचा हेतू हा, की त्याच्या शाळेतले शिक्षक भारतीय आहेत, हे तुम्हाला कळावं. तर त्या गणपतीसाठीच्या कार्यक्रमात, मुलांनी गणपतीशी संबंधित काहीतरी करून दाखवावे, अशी अपेक्षा होती.

आदित्यला खंर म्हणजे कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायला किंवा कुठल्या प्रकारचा परफॉरमन्स वगैरे करायला अजिबात आवडत नाही. त्याकरता, मी त्याच्या कधी मागे पण लागत नाही, पण त्याला गणपती अथर्वशीर्ष पाठ येत असल्यामुळे तो टीचर ला नाव देऊन आला. दोन दिवसांनी मला वाटतं निवड फेरी होती. तिथे छानपैकी त्याने ते म्हणून दाखवलं. बाकी मुलांनी पण काय 'देवा हो देवा' वगैरे गाण्यांवर नाच बीच दाखवले म्हणे. कोणीतरी जय गणेश गाणं म्हंटल, कोणीतरी कविता म्हणून दाखवली आणि असंच काहीसं. ते सगळं पाहून आपण नक्की सिलेक्ट होणार अशी त्याची अपेक्षा.

दुसऱ्या दिवशी टीचर ने सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं सांगितली आणी आदित्यला सांगितलं की, "आय वॉन्ट टू सिलेक्ट यू, यू रिसाईटेड व्हेरी नाईसली बट आय कान्ट, बिकॉस युवर स्तोत्रा इस व्हेरी लॉंग..

हा हिरमुसला होऊन घरी आला..... काय झालं विचारलं तर जे शाळेत घडलं ते संगीतलन. मी म्हंटल ठीक आहे, हे मोठं आहे तर संकटनाशन स्तोत्र म्हणून दाखव उद्या, ते जरा लहान आहे ह्याच्यापेक्षा. दुसऱ्या दिवशी त्याने टीचर ला ते म्हणून दाखवलं. तर टीचर ने माझा फोन नंबर मागितला.

आता इथे खऱ्या गमतीला सुरवात होत्येय हं. तुम्हाला काय वाटतं? का फोन करायचा असावा टीचरला मला? माझ्या मुलाचं कौतुक करायला करायचा असावा, असं वाटतंय ना? की, किती छान म्हणतोय तुमचा मुलगा ही स्तोत्र!!! कोणी शिकवलं ह्याला? वगैरे असं काहीतरी विचारायला?.... थांबा जरा, हसता हसता खुर्चीतून पडायची वेळ येणार आहे तुमच्यावर…ती मला फोन करून म्हणाली, धीस स्तोत्रा इज गुड बट टू लॉंग… आय डोन्ट वॉन्ट टू डिसकरेज द चाइल्ड, सो, कान्ट यु एडीट इट and मेक इट स्मॉल?
बोलायला शब्द सापडत नाहीत अशी आयुष्यात फार कमी वेळा स्थिती झाल्येय माझी. हा प्रसंग त्यापैकी एक आहे. मला खरच सूचेना कि ह्यावर काय बोलावं? अथर्वशीर्ष एडीट करायचं????????????????? कपाळाला हात लावला. ही टीचर, नाव नाही सांगत, इंडिअनच आहे बरं का.

मी तिला, आत्ता मी जरा कामात आहे मी तुमच्याशी नंतर बोलते, असं सांगून फोन ठेऊन दिला. कारण मुर्खाशी गाठ पडता काय करावे?.............. अगदी बरोब्बर ……………. गप्प बसावे............. तेच मी केलं.

नंतर शाळेच्या प्राचार्यांना फोन करून कथा कथन केली व मी ह्यावर काय करावे ह्याबद्दल सल्ला मागितला. त्यांचीही अवस्था माझ्या सारखीच झाली............... त्यांनाही माझ्याशी बोलायला शब्द शोधावे लागले. स्वतःच्या शाळेतल्या शिक्षिकेच्या मूर्खपणाबद्दल माफी मागून त्यांनी आदित्यची स्वतः निवड केली. गणपती बाप्पाचीच कृपा कि मला काय म्हणायचं होतं ते त्यांना तरी सहजपणे समजलं आणि माझ्या पुत्राने खणखणीत आवाजात, न चुकता, ते स्पेशल असेम्ब्ली च्या दिवशी, म्हंटलं. पूर्ण म्हंटलं हं. एडीट केलेलं नाही.

ती टीचर, आता त्या शाळेत नाही, पण जेवढे दिवस होती, तेवढे दिवस, मी दिसले, कि मारक्या म्हशी सारखी मला बघायची. जय हो........असेही काही सिंगापूर मध्ये राहणारे भारतीय, ज्यांना अथर्वशीर्ष आणि बॉलीवूडचं गाणं सारखंच वाटतं……………. लहान करण्याकरता एडीट करायचं... कि झालं………

No comments:

Post a Comment