ही हकीकत साधारण १९६० सालच्या दरम्यान ची. कोकणात आमच्या वाड्यात भयंकर प्रमाणात घुशी झाल्या होत्या. जिथे तिथे त्यांची बिळं दिसायची. रोज नव्या ठिकाणी माती उकरलेली असायची. घरात अनेक वस्तूंची नासधूस, कधीतरी एखाद्याला शारीरिक इजा असा प्रचंड उपद्रव सुरु होता. वेगवेगळी औषधं, सापळे असे उपाय करून आम्ही एक दोन घुशी पकडल्याही, पण तरी त्रास सुरूच होता.
काय करावे समजत नव्हते, इतक्यात कोणीतरी माहिती दिली कि गावाबाहेर जी कातकरी लोकांची वस्ती आहे, त्यातील मंडळी, उंदीर घुशी पकडण्यात तरबेज आहेत, तसा मी लगेच त्यांच्या वस्तीकडे गेलो व चौकशी केली.
त्यांचा एक माणूस येऊन, आमचं घर पाहून, उद्या येउन घुशी पकडतो, असं सांगून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने दोन घुशी पकडल्या. त्याला मी त्याबद्दल आठ आणे दिले. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. पण प्रकरण संपलं नाही. घूशी धुडगूस घालतच होत्या आणि त्यांचा जर काही बंदोबस्त केला नाही तर बिकट परिस्थिती निर्माण होणार असा एकूण रंग दिसयला लागला.
दोन दिवसांनी मी परत त्यांच्या वस्तीवर गेलो. तेव्हा मला माणक्या नावाचा एक माणूस भेटला. आधी आला होता तो जगन्या. माणक्याच्या म्हणण्याप्रमाणे, जगन्या त्याला, आमच्या घरा बद्दल बोलला होता. त्याच्या मते घुशी जास्त असल्यामुळे, सहजासहजी त्यांना नष्ट करणे कठीण होते. त्याकरता विशेष पद्धत वापरणे गरजेचे होते आणि त्या करता खर्च जास्त होता.
मी भयंकर त्रासलेल्या मनस्थितीत असल्यामुळे, जास्त विचार न करता, त्याकरता संमती दिली आणी एक घोडचूक करून बसलो. माणक्याने एका घुशी करता एक रुपया असा भाव ठरवला. मी हो-नाही करत थोडी घासघीस केली, पण शेवटी त्याला हो म्हणालो. माझ्या अंदाजा प्रमाणे माझ्या खिशाला दहा- बारा रुपयाची चाट बसणार होती, डोक्यावरून पूर म्हणजे वीस रुपये. मनोमन त्याची तयारी केली.
घुशीला रुपया ठरल्यावर मणक्या भलताच उत्साही दिसू लागला. दुसऱ्या दिवशी साधारण दहा बारा पुरुष घुशी पकडायची तयारी करून आमच्या घरी आले. माणक्याला विचारलं, तर म्हणाला, "मदतीला लागनार मला". एवढे लोकं आलेले पाहून थोडं आश्चर्य वाटलं, पण पैसे माणसांप्रमाणे द्यायचे नसल्यामुळे जास्त विचार केला नाही. त्यांच्या बरोबर काही बायका व मुलही आलेली दिसत होती. त्या बायका आणि मुलं घरात मात्र आली नाहीत. ती वाड्यापासून जरा लांब अंतरावर घोळका करून उभी राहिली. त्यांच्या बद्दल विचारल्यावर "असुदे रे बामना, हितं नाय येनार, निस्त्या उब रहानार" असं मणक्या म्हणाला. मनात म्हंटलं, "राहिनात का", "आत नाहीना येत ,मग जाऊदे". त्या बायकांकडे एक मोठं अल्युमिनियमचं पातेलं दिसलं, त्याबद्दल मणक्याला विचारलं, तर म्हणाला, "जाताना पानी नेनार". फारसा काही खुलासा झाला नाही. पण मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि मणक्याला कामाला लागायला सांगितलं.
घरच्या गड्यांना जवळ बोलावून सगळ्यांवर लक्ष ठेवायला सांगितलं स्वतःही देखरेख करू लागलो. आमचे जनुमामा आले होते ते ही माझ्या बरोबर उभे होते. गावातली काही उत्साही मंडळीही घुशीना कसं पकडतात ते पाहायला आमच्या घरी जमली होती.
मग घूशी पकडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आजचा सगळा रंग न्याराच होता. त्या आलेल्या मंडळीनी एके ठिकाणी माती भिजवली, त्यात थोडा चारा मिसळला, त्याचे गोळे तयार केले व वाड्याभोवती फिरत फिरत दिसतील तेवढी बिळं, एक एक करून बुजवू लागले. आम्हाला कधी दिसली सुद्धा नसतील एवढी बिळं त्यांनी बुजवली. मागच्या बाजूला एक आणि पुढच्या बाजूला एक एवढी दोनच बिळं त्यांनी न बुजवता ठेवली. मग थोडा वेळ नुसतेच बसून राहिले.
कशाकरता विचारल्यावर, “माती सुकायला पायजे ना, म्हंजे मंग, तिथून निन्गू सकनार नाय घूस, असं उत्तर मिळालं”. नक्की ही मंडळी काय करणार? काही समजेना.
थोड्यावेळाने त्यांनी मागच्या बाजूला असणाऱ्या बिळाच्या तोंडाशी बराच चारा ओला करून पेटवला आणि पुढच्या बाजूला असलेल्या बिळाच्या तोंडाशी, त्यांचे एक कामेरू सारखे दिसणारे हत्यार घेऊन, दोन माणसं बसली.
ओल्या चाऱ्याचा, पेटवल्यावर धूर होऊ लागला, आणि बिळाच्या आत भरू लागला. साधारण वीस मिनिटांनी एक भली मोठी घूस पुढच्या बिळातून बाहेर आली. मंडळीनी, त्यांच्या हत्याराने चपळाईने तिला मारले, आणि त्यानंतर आम्ही जे पहिलं, त्याने आम्हा घरातल्या सर्व मंडळींवर, बेशुद्ध पडायची पाळी आली. पुढील तीन तासात बिळातून एकूण एक्याण्णव घूशी बाहेर आल्या.
माझी पाचावर धारण बसली, कारण एक्याण्णव रुपये ह्यांना द्यायचे कुठून? तेवढे पैसे घरात होते कि नाही ह्याची सुद्धा शाश्वती नव्हती. जनुमामाना सगळी परिस्थिती सांगितली. आता हळू हळू परिस्थिती आमच्या लक्षात येऊ लागली. त्या कातकर्यांना, घरात किती घूशी असणार ह्याचा आधीच अंदाज होता, म्हणूनच त्यांनी सगळी योजना करून, घूशीला एक रुपया, असा सौदा करून, आम्हाला भलत्याच मोठ्या संकटात टाकलं होतं.
जनुमामा आमचे वकील, मला म्हणाले "थांब जरा, घाबरू नको, करू काही तरी, आणि काहीच नाही झालं तर माझ्याकडे आहेत पैसे,ते मी देतो तुला". जनुमामांच्या डोक्यात चक्र फिरू लागली, आणि ते मला म्हणाले "माझ्या अंदाजानी, त्या बायका,घूशी भरून नेण्याकरता, पातेलं घेऊन आल्यायत”. “ही मंडळी बहुदा उंदीर घूशी खाणार्यांपैकी दिसतायत. बघूया प्रयत्न करून काही पैसे वाचतायत का ते.”
मग जनुमामा माणक्याला म्हणाले, "माणक्या, आता सगळे मिळून आणखी एक काम करा बाबा, लागले तर त्याचे दोन रुपये आणखीन देईन, पण आता जरा आमच्या कलमाच्या भोवती माती उकरून दोन तीन, दोन तीन करून ह्या घूशी पुरून टाका, म्हणजे आमच्या कलमांना खत होईल जरा".
माणक्या एकदम चमकलाच आणि फटकन उठून म्हणाला, “तसा कसा? बामना घूशी आमच्या”. जनुकाका मला म्हणाले, “काय रे काय बोली होती”? मी म्हंटलं, "जितक्या घूशी मारतील तितके रुपये अशी". जनुमामा मामा माणक्याला म्हणाले, “घूशी तुम्हाला देण्याची बोली नाही. पैसे तुला एक्क्याण्णव रुपये देतो”.
पण माणक्याला घूशी हव्या होत्या. गावात बहुतेक मंडळी मेजवानीच्या तयारीत होती. त्यामुळे तो का कुं करायला लागला. मग जनुमामानी त्याला सज्जड दमच भरला. त्याला म्हणाले “आमचा मुलगा गरीब स्वभावाचा, म्हणून फसवायला निघालास काय”? “एवढ्या घूशी आहेत हे तुला आधीच समजलं होतं म्हणून घुशीला एक रुपया ठरवलास कि नाही?” “घूशी हव्या असतील तर नीट व्यवहाराचं बोल नाहीतर पैसे घे आणि चालता हो".
माणक्या पण जनुमामांशी अदबीने बोलत होता, कारण ह्यांच्यापैकी कोणी चोरी बिरी करताना पकडला गेला कि त्यांना जनुमामा लागायचे.मग बरीच घासघीस होऊन, सौदा, सगळ्या घूशी आणि वीस रुपये असा तुटला. त्याकाळी वीस रुपयेही भारंभार रक्कम होती. त्यामुळे ते सगळे आनंदातच होते. कितीतरी पैसे वाचले ह्या विचाराने मला तर हर्ष वायूच व्हायची वेळ आली.
मग लगेच त्यांच्या बायकांनी आत येउन सगळ्या घूशी पातेल्यात भरल्या आणि लगेच निघून गेल्या. माणक्यापण, "जनुमामाना, "बामना चिडू नको , इतक्या घूशी असणार असं माला पन नाय म्हाईत होता". असं म्हणत सारवा सारवी करत, त्याच्या माणसाना घेऊन निघून गेला.
जनुमामांच्या समयसूचकतेमुळे, निरीक्षण शक्तीमुळे आणि त्यांच्या तल्लख बुद्धीमुळे आम्ही त्यादिवशी मोठ्याच प्रसंगातून निभावलो. ह्या आलेल्या अनुभवामुळे, मी, परिस्थितीचा सगळ्या अंगाने विचार करून मग निर्णय घ्यावा, हा धडा शिकलो.
"अनुभव हा किती मोठा शिक्षक असतो ना?"
हकीकत सांगणारा जरी दुसरा कोणीतरी असला, तरी अनुभवाचं मोल शिकवणारी, अशी ही हकीकत असल्यामुळे माझ्या मनातल्या गोष्टीं मधे, हीचा समावेश...............

No comments:
Post a Comment