गेले काही दिवस श्रद्धा, अंधश्रद्धा, नवस वगैरे गोष्टींबद्दल भरपूर पोस्ट वाचनात आल्या. वर्गीकरण करायचं म्हंटलं तर चर्चा करणाऱ्या मंडळींचा,तीन गटात, समावेश करता येईल. पहिला गट विश्वास ठेवणाऱ्या मंडळींचा, दुसरा देव नाही असं म्हणणाऱ्या मंडळींचा, आणि तिसरा ,ज्यांना ठाम मत नाही असा, म्हणजे देव आहे कि नाही, माहित नाही, पण असलाच तर आपला नमस्कार करून ठेवलेला बरा, असं मानणारा.
आज तुम्हाला स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या दोन घटना सांगते.
पहिली घटना आमच्या माहितीतल्या एका बाईंच्या बाबतीतली. माझ्या आईच्या माहितीतल्या एक बाई, नाव नाही सांगत, पण त्यांना, आमचं कुटुंब पुष्कळ वर्ष ओळखतं. ह्या बाईंना लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष मुलबाळ काही नव्हतं. त्यांनी गणपती बाप्पाला नवस बोलला कि,”जर मला बाळ झालं तर मी एकवीस वर्ष घरी गणपती आणेन आणि साग्रसंगीत मनोभावे पूजा करेन”.
त्यानंतर, त्यांना काही महिन्यातच दिवस राहिले आणी सुरेख मुलगा झाला. त्यांनी नवस बोलल्याप्रमाणे एकवीस वर्ष घरी गणपती उत्सव साजरा केला. एकविसाव्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळी सात वाजता ट्रकचा धक्का लागून गेला. अतिशय हृदयद्रावक अशी ती घटना, सगळ्यांना अतिशय दुखीः करून गेली. माझी आई जेव्हा त्यांच्या सांत्वनाकरता गेली तेव्हा त्यांनी नवसाबद्दल आईला सांगितलं आणी त्या आईला म्हणाल्या, “मला तर वाटतं, मला आनंद देण्याकरता जसा काही बाप्पाच आमच्या घरी एकवीस वर्ष आला. मला नेहमी गणपती आणेन, असं बोलायची बुद्धी का नाही झाली हो?”
दुसरी घटना आमच्या भटांच्या घरी घडलेली. आमच्या घरी चारी भावांपैकी कोणातरी एकाच्या घरी दरवर्षी गणपती उत्सव साजरा व्हायचा. त्या वर्षी सगळ्यात धाकट्या काकांचा घरी गणपती होता. आमच्या अण्णा काकांचे (मधले काका)एक सहकर्मचारी त्यांच्या बरोबर आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आले.
त्यांचे नाव गोलानी. हे गोलानी काका सिंधी. त्यांचा गणपती वगैरे संकल्पनेवर कितपत विश्वास होता कोणास ठाऊक? ते आपले मित्राच्या घरी, काहीतरी विशेष आहे म्हणतोय, तर जाऊन येऊया, अश्या विचाराने आमच्या घरी आले असावे. गोलानी काकांचा उजवा हात थोडासा अधू. म्हणजे, सांगायचंच झालं तर, लगान चित्रपटातल्या ‘कचरा’ सारखा.
ते आले तेव्हा तिथे काही इतर पाहुणेही होते. आमचा गणपती सोवळ्यातला असल्यामुळे सगळेजण लांबूनच फुलं, पैसे वगैरे वहात होते. त्यांनी त्या लोकांना दर्शन घेताना बघितलं, आणी स्वतःही दर्शन घेण्याकरता गणपतीच्या जवळ गेले. त्यांनी गणपतीच्या समोरच दुसऱ्या कोणीतरी वाहिलेलं एक रुपयाचं नाणं, त्यांच्या उजव्या हाताने उचललं, आणी गणपतीवर टाकलं. आम्ही सर्वांनी ते पाहिलं. आम्हाला ते फारच विचित्र वाटलं पण घरी आलेल्या पाहुण्याला काय बोलणार अशी सगळ्या लोकांची स्थिती झाली. बरं हे एवढ्यावरच संपलं नाही. त्यांच्या अधू हातामुळे कि काय, त्यांनी टाकलेलं नाणं, गणपतीच्या दातावर आपटून त्याचा दात तुटला.
मग आमच्या घरात भूकंपच झाला. शुभ अशुभाच्या चर्चांना उधाण आलं. काळजीने सर्वांचे चेहरे काळवंडले. संकट निवारणासाठी नवस बोलून झाले, गुरुजीना फोन झाले. शेवटी, झालंय त्याला आपला काही इलाज नाही, ‘होणारे नच टळे’, असा एकूण सूर लागला.
मग माझ्या काकांनी फेविकॉलनी गणपतीचा दात चिकटवला. सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घालून देवाची माफी वगैरे मागितली.तरी डोक्याचा ताप काही कमी झाला नाही. काहीतरी अशुभ घडणार असं सगळ्यांना वाटत राहिलंच.जणू काही घरातील सर्व मंडळी वाईट बातमीची वाट पाहतायत असं मला वाटू लागलं. घरातली गणपतीची मजा संपली आणि फक्त नियमितपणे, अनेक वर्ष करत असलेले विधी, सुरळीतपणे मुकाट्याने सुरु राहिले.
ह्यानंतर दोनच दिवसात घडलेली घटना. गोलानी काका, रस्त्यावरून कानाला transistor लावून गाणी ऐकत चालले होते. त्यांचा कशाला तरी पाय अडखळला आणि transistor खाली पडला. तो उचलण्याकरता ते खाली वाकले तेव्हा एका माणसाचा त्यांना धक्का लागला. तोल गेल्यामुळे ते वेडे वाकडे पडले आणि त्यांचे समोरचे, दोन दात तुटले.
आमच्या घरी बातमी कळल्यावर, गोलानी काकांबद्दल वाईट वाटलं, त्यापेक्षा आपण सुटल्याचा आनंद, घरच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला जास्त दिसला. गमतीची गोष्ट म्हणजे ज्यांच्या हातून गणपतीचा दात तुटला त्यांना त्याबद्दल चांगलं वाईट काहीच वाटलं नव्हतं. आमच्या घरात मात्र प्रचंड गोंधळ माजला होता. कारण अगदीच सरळ आहे. आम्ही देव आहे ह्यावर विश्वास ठेवणारी मंडळी होतो.
ह्या दोन घटनांच्या अनुषंगाने विचार करायचा म्हंटला, तर दोन्ही घटनांचं लॉजिकल, किंवा rational स्पष्टीकरण देणे फार अवघड आहे.देव मानणारे म्हणणार; प्रचीती, तर देव न मानणारे म्हणणार; योगायोग.
आता ह्यावर थोडसं माझ्यापुरतं बोलते.
पहिल्या घटनेचा मी जेव्हा विचार करते, तेव्हा माझ्या मनात असं नेहमी येतं, कि कदाचित त्या बाईंच्या नशिबात, अपत्य सुख एकवीस वर्षां करता असावं, म्हणून त्यांना एकवीस वर्षाचा नवस बोलायची बुद्धी झाली असावी. गोलानी काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, त्यांचा अपघात कदाचित होणारच असावा त्याचा संकेत देवानी त्यांना आधी दिला असावा. मात्र हे सगळं घडवणारी कुठली तरी शक्ती अस्तित्वात नक्की असावी असं मला मनापासून वाटतं.
मी स्वतः देव मानते, माझ्या मते ती एक शक्ती आहे, एक चांगली शक्ती, जी आपली हितचिंतक असते. आपल्या जीवनात आपण करत असलेल्या वाटचालीत, ती आपले मनोबळ वाढवण्याचे काम करते. जीवनातल्या चांगल्या वाईट प्रसंगात ती आपल्या बरोबर असते.
पुढे जाऊन आपल्याला त्या शक्तीला, कुठलंतरी रूप द्यावं, असं वाटू लागतं, आणि मग, प्रत्येक मनुष्य त्या शक्तीचं स्वतःला आवडणारं एक रूप, मनात तयार करतो. मनातल्या सर्वात आवडलेल्या रूपाप्रमाणे कोणी गणपती, कोणी देवी, कोणी शंकर, कोणी मारुती अश्या रुपात त्याला पाहून, पुजू लागतो.
पूजा कशासाठी? असा विचार जर केला ,तर त्याचं उत्तर, त्या शक्तीचे आभार मानण्यासाठी, आपल्या मनाला प्रसन्न वाटतं म्हणून आणि मनाला शांतता लाभावी म्हणून, असंही देता येईल.
आपण जीवनात यशस्वी होण्याकरिता सतत खूप कष्ट आणि प्रयत्न करत असतो. त्या सर्व धावपळीत देवाचे स्मरण, त्याला नमन हा एक विसावा आहे, असं मला वाटतं.
आपल्याला काय वाटतं?

Yalach Andhshradha ASE mhantat ,tyache pudhche ASE je je vhayache te honararach ahe je je hote te changlya sathi hote ASE ,
ReplyDeletePratek kshan anandat kasa janar yachi kalaji ghyavi