कल्याणला शिवाजी चौकानातून कृष्णा थीएटरच्या शेजारच्या गल्ली वरून सरळ खाली गेलं, कि मुसलमान मोहोल्ला सुरु होतो. तिथे आमच्या तात्यांचे तीन मित्र राहायचे, एकाचे नाव अश्मथ, एकाचे रौफ व एकाचे इस्माईल, त्यापैकी अश्मथ व रौफ हे त्यांचे रेल्वेतले मित्र. इस्माईलशी कशी मैत्री ह्याबद्दल मला फारसं माहीत नाही. मी त्या सगळ्यांना चाचा म्हणायची.
ह्या तिघांच्याही घरी, आम्ही घरातले सर्व इदीच्या दिवशी जायचो आणी मस्तपैकी बिर्याणी व शिरकुर्मा ह्यांचा आस्वाद घ्यायचो. माझी आई सामिष आहार घेत नसल्यामुळे तिच्याकरता स्पेशल वेगळा स्वयंपाक केलेला असे. तीन घरी थोडं थोडं जरी खाल्लं तरी पुढील दोन दिवस जेऊ नये इतकं आमचं पोट भरत असे.
आई तीनही घरात द्यायल, सारख्याच भेटवस्तू आणत असे. मला आठवतं, इदीच्या आधी तात्या, जितके मिळतील तितके, सुट्टे पाच रुपये जमा करायचे, व तिथे गेलेलं असताना, जितकी मुलं समोर असतील त्यांना पाच रुपये इदी म्हणून द्यायचे. तेवढ्या तीन चार तासात ते दीडेकशे रुपये, सहज इदी म्हणून वाटत असतील.
आम्ही जसे इदीला त्यांच्याकडे जायचो, तसेच, त्या तीन कुटुंबातले सर्वजणही,अगदी पै पाहुण्यानसकट दिवाळीच्या नर्कचतुर्दशीच्या दिवशी आमच्या घरी यायचे. ह्या सर्वांची,माझ्या आईला, इडली करण्याची स्पेशल रिक़्वेस्ट असायची. आमच्या घरी तेव्हा इलेक्ट्रिक वर चालणारा रगडा असल्यामुळे आईच्या इडल्या अगदी सुरेख हलक्या व लुसलुशीत व्हायच्या ,आणी त्या, ह्या सर्व मंडळीना अतिशय आवडायच्या. म्हणून, दिवाळीच्या फराळाच्या शिवाय आई सगळ्यांसाठी इडली सांबर करत असे.
त्यांच्या सगळ्या बायका येताना बुरखा घालून यायच्या व आमच्या घरी आल्या बरोबर, "भट से क्या परदा करना, भट तो भाई है" असं म्हणत, लगेच बुरखा काढून टाकायच्या. आमच्या आईला म्हणायच्या, वैनी, कितनी तकलिप से हर बार इडली बनाते आप,आपका बोहोत बोहोत शुक्रिया". "ये दिवाली का मोका अच्छा है, भट के वजे से भाअर निकलनेको मिलता, न्हइ तो घरमे बैठके सर पक्ता हमारा." मग अगदी पोटभर गप्पा मारून, आम्हाला दिवाळीची भेट वगैरे देऊन,चार तास बसून हि मंडळी परत जायची.
एकदा मी तात्यांबरोबर अश्मथ चाचाच्या घरी गेले होते व काही कारण नसताना," तात्या हे घर अगदी पडायला झालाय हो, मला तर वाटतं कधीही पडेल", असं म्हणाले. तात्या मला,"गप्पा बस" वगैरे काहीतरी म्हणतच होते, तेवढ्यात अशमथ चाचाने मी काय म्हणत्येय ह्याची चौकशी केली.
"कुछ नाही, बच्ची है, ऐसेही कुछ बक्ती है",असं म्हणत, मी काय बोलले होते ते तात्यांनी त्याला कसंतरी सांगितलं. तो अश्मथ चाचा टरकलाच एकदम, आणि म्हणाला, "अरे भट, बक्ती नही है, बच्चे के मुह से भगवान बोलता है, अब जल्द ही मुझे दुसरा घर धुंडना पडेगा"!
आगाऊपणा केल्याबद्दल बाहेर निघाल्यावर ओरडा मिळाला. अश्मथ चाचाने ते घर आठ दिवसात रिकामं केलं व 'इस्माईल मंजिल' नावाच्या इमारतीत, जी इस्माईल चाचाच्या वडिलांची इमारत होती, तिथे भाड्याने दोन खोल्यांमध्ये राहायला आला. मी शहाणपणा केलेला असल्यामुळे तात्यांनीच त्याला हि जागा मिळण्याकरता, इस्माईलचाचाकडे शब्द टाकला व त्याला घर मिळवून दिलं. पुढे आठच दिवसात अश्मथ चाचाचं आधीचं घर, कावळा बसायला आणि फांदी मोडायला म्हणतात तसं, जमीनदोस्त झालं. अश्मथ चाचाने मला खास मिठाई आणून दिली, आणि सारखा तात्यांना म्हणत राहिला, "देख भट मै बोला था ना, बच्चे के मुह से भगवान बोलता है!",(आणि तो भगवानाच म्हणत होता हं, अल्ला बिल्ला नाही),बोहोत मेहेर उसकी".मग मी त्या अश्मथ चाचाची जरा विशेष लाडकी झाले.
अश्मथ चाचा ह्या इस्माईल मंजिल मधे राहायला आला आणी एक नवीनच कहाणी सुरु झाली. अश्मथ चाचाला तीन मुलगे, शौकत,मेहमूद आणि रियाज. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या इसमाइल चाचाला तीन मुली, नाझ, नाझरा आणि नाझरीन. त्यात नाझचं लग्न झालेलं होतं, त्यांच्या दुसऱ्या मुलीकरता, म्हणजे नाझरा करता ते मुलगा शोधत होते.
त्या नाझराला येताजाता कधीतरी, अश्मथ काकाचा मोठा मुलगा शौकत दिसला, व आवडला. हि बातमी इथून तिथून,बिल्किसच्या,म्हणजे तिच्या आईच्या कानावर गेली. माहिती काढल्यावर तिलाही मुलगा आवडला कारण, जरा गरीब घरचा असला, तरी शौकत खूप शिकलेला, म्हणजे L.L.B झालेला होता, स्थळ म्हणून first class होता.
ह्या सगळ्या कहाणीचा,शौकतला किंवा अश्मथ चाचाला काही पत्ता नव्हता, कारण बुरख्यातून मुलीना मुलगे दिसत असले, तरी शौकतने काही नाझराला पहिली नव्हती. असंही, त्यांच्यात लग्नाआधी मुलीला पाहण्याची पद्धत तेव्हा नव्हतीच. पण असं काहीतरी चालू आहे, हे हि त्याना माहित नव्हतं.
ह्या मुसलमानांच्यात मुलगी सांगून जाण्याची पद्धत नाही, त्यांच्या मुलीकरता, मुलाकडून रिश्ता यावा लागतो.
ह्या रिश्ता सांगून येण्याच्या भानगडीमुळे इस्माईलचाचाकडच्या मंडळींची मोठी पंचाईत झाली.
बरं तो इस्माईल चाचा, तो भारतात राहायचा नाही, सौदी ला असायचा, त्यामुळे ह्या बिल्किसचाची ला एकटीलाच सगळं बघावं लागायचं. काय करावं ह्या पेचात ती पडली होती आणि तिला भट ची आठवण झाली.
दोन्ही घरात येणं, जाणं असणारे तेच एक होते.
त्याकाळी त्यांच्याकडे फोन होता पण आमच्या घरी नव्हता, त्यामुळे संपर्क करण्याकरता आमच्या घरी येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ती विचारात पडली व एक दिवस अचानक काही न कळवता आमच्या घरी आली. आमच्या घरी, तिच्या येण्याने सगळे जरा गोंधळात पडले. आल्यावर तिने सगळी कहाणी सांगितली आणि तात्यांना मध्यस्ती करून, रिश्ता सांगून येण्याची व्यवस्था करायला सांगितलं. मुलाची परिस्थिती बेताची असली तरी, आमच्या मुलीला मुलगा आवडला असल्यामुळे, आम्हाला चालणार आहे",असेही आवर्जून सांगितले.
ती गेल्यावर दहा मिनटांनी, तात्या, आपल्याच मुलीचं लग्न ठरत असल्यासारखं, भराभरा, सायकलवरून अश्मथ चाचाच्या घरी गेले व सर्व प्रकार सांगितला. शौकतच्या आईला, म्हणजे अश्मथ चाचाच्या बायकोला खूप आनंद झाला. विचार करून लवकरच ठरवतो असे अश्मथ काकांनी सांगितले. ही बातमी वर जाऊन इस्माईल चाचाच्या घरी सांगून तात्या परतले.
आठ दिवस होऊन गेले तरी पुढे काही प्रगती होईना तशी तात्या परत अश्मथ चाचाकडे गेले. तिथे एक समस्या उभी राहिली होती. तात्या त्याना भेटून आल्यानंतर, त्या लोकांनी शेजार पाजारी मुलीची चौकशी सुरु केली. तो शौकत बेट्या, लग्नाकरता तयार होणारच होता, इतक्यात,कोणातरी नतद्रष्ट माणसाने,नाझरा चकणी आहे असं खोटं त्याला सांगितलं होतं, त्यामुळे तो लग्नाला तयार नव्हता. तात्यांनी त्याला, अरे मी मुलीला पाहिलंय, तसं काही नाही,तू बेधडक लग्नाला तयार हो,असं सांगितलं. पण त्याला काही ते पटेना.
ही गोष्ट confirm करण्याकरता मग, आई आणि आम्ही मुली, अजून एकदा बिल्किसचाचीकडे गेलो, व नाझराला पाहून आलो. ती चकणी नाही असं शौकतला पटवून द्यायचा प्रयत्न केला.
तरी अडलेलं घोडं काही पुढे सरकायला तयार होईना. मुलगी स्वतः पहिल्या शिवाय मी लग्न करणार नाही असं शौकत ने जाहीर केलं.
दोन्ही घरात सर्व मंडळी मोठ्याच पेचात पडली. मग ही समस्या मुलीचे आजोबा इमाम भाई ह्यांच्या पर्यंत गेली व त्या वयस्कर माणसाने, मुसलमान समाजाच्या दृष्टीने पाहायला गेलं, तर अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी नातीच्या आनंदासाठी,मुलाला मुलगी दाखवण्याची तयारी दाखवली. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी लगेच, शौकतला स्वतःच्या खोलीत बोलावून, नाझरा दाखवली.
ही नाझरा चकणी वगैरे तर सोडाच,उलट इतकी सुंदर होती कि तिला पाहून हा शौकत गारच झाला. नाझरा हळूच त्याला म्हणाली, "कहो तो चलके भी दिखाऊ"?मग हा शौकत भलताच ओशाळला व त्याने ताबडतोब लग्नाला होकार देऊन टाकला.
लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांची सगाई झाली व महिन्याभरात, धामधुमीत निकाह पण.
गमतीची गोष्ट म्हणजे, ह्या दोन मुसलमानांच्या लग्नात, लग्नाच्या दिवशी, मौलवी साहेबांपेक्षाही जास्त मान एका हिंदू माणसाला, म्हणजे अर्थातच, आमच्या तात्यांना मिळाला.

No comments:
Post a Comment