लग्नाच्या सुरेख बंधनात बांधलं गेल्यानंतर बहुतांश जोडप्यांची आपल्याला एक तरी अपत्य व्हावं अशी इच्छा असते. बहुतेक स्त्री पुरुषांच्या बाबतीत, ती गोष्ट, निसर्ग नियमानुसार, वर्षा दोन वर्षात घडते. काही मंडळी अपत्य प्राप्तीची वेळ स्वतःच्या इच्छे प्रमाणे थोडी पुढे मागे करण्याचा प्रयत्न करतात. काही मंडळीना बाळ होण्याकरता वैद्यकीय मदत घेण्याची गरज भासते तर काही मंडळीना मदत घेऊनही ते सुदैव प्राप्त होत नाही.
आज मी माझ्या अश्याच एका मैत्रिणी बद्दल बोलणार आहे. तिचं नाव मी अर्थातच तुम्हाला सांगणार नाहीये. तुम्ही तुमच्या मर्जी प्रमाणे तिला हवं ते नाव देऊ शकता. मी तिला 'ती' असंच म्हणणार आहे.
तिचं लग्न माझ्या लग्नाच्या साधारण दोन ते तीन वर्ष आधी झालं,आमच्या एका जवळच्याच माहितीतल्या मुलाशी. सण समारंभ, कार्य किंवा कधीतरी अशीचही, ती आमच्याकडे येऊ लागली. माझ्या लग्नाच्या वेळेपर्यंत काही बायका तिला, " काय? गुड न्यूस केव्हा? का प्लानिंग"? असे प्रश्न विचारयला लागल्या होत्या. ती कधीतरी हसून, कधीतरी लाजून, कधीतरी काहीतरी उत्तर देऊन तिची प्रतिक्रिया देत असे.
माझ्या लग्नाला वर्ष झालं, तेव्हा तिला मुल हवय पण होत नाही असं उडत उडत कानावर आलं. आमच्याकडच्या कोणीही त्याबाबतीत तिला कधीच काही विचारलं नाही. एक दिवस ती स्वतःच आमच्या घरी येउन त्या विषयावर बोलू लागली. त्यावेळी मी मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होते म्हणून असेल, समवयस्क होते म्हणून असेल किंवा, आम्ही तिची, तिच्या पाठी खिल्ली उडवणार नाही ह्याची खात्री वाटल्यामुळे असेल, पण तिने, तिची समस्या आम्हाला सांगितली.
मी तिला माहितीतल्या एका इनफरटीलिटी स्पेशलिस्ट चा पत्ता दिला. त्यानंतर दोघे पती पत्नी त्यांच्याकडे तपासणी करून आले. दोघांपैकी कोणामधेही कसलाही दोष नव्हता. दोघेही आनंदी झाले. मग पूजाअर्चा,उपासतापास, गंडे दोरे हे ही सुरु झालं. वैद्यकीय मदत घेणेही सुरूच होते. ह्या मैत्रिणीच्या बाबतीत घरातील मंडळी अतिशय समजूतदार व चांगली होती, हे तिचे सुदैव. समाजात तिला काही वाईट अनुभव आलेही पण बहुतेक माणसं तिला चांगली भेटली होती.
असं करता करता दहा वर्ष गेली, पण काहीही दोष नसताना सुद्धा, कुठलाही उपाय कामी येत नव्हता. कृत्रिम गर्भधारणा पद्धतीच्या वापरानेही यश मिळालं नाही. साधारणपणे दहा पंधरा लाख रुपये खर्च झाला. मग हळू हळू मुल दत्तक घेण्याच्या विचारापाशी ती रेंगाळायला लागली.
एक दिवस,ती आमच्या घरी मुल दत्तक घेण्याच्या विषयावर बोलत होती. ती जे बोलत होती, त्यात एकीकडे तिला मुल दत्तक घ्यावं असं वाटत होतं आणि दुसरीकडे आमच्यात काही दोष नाही, मग आम्हाला का होत नाही मुल? अशी विफलता दिसत होती.
खरंच काय मनोव्यापार असतील अश्या स्त्रियांचे? मनात अनेक प्रश्न पण उत्तर कुठल्याही प्रश्नाला मिळत नाही ही किती भयंकर परिस्थिती!!! दुर्दैवाने, आमच्याकडेही तिच्या प्रश्नांना उत्तरं नव्हती.
पुढे आणखी पाच वर्षानंतर तिने एका मुलीला दत्तक घेतलं, तेव्हा माझी मोठी मुलगी अकरा वर्षांची व मुलगा सहा वर्षांचा झाला होता. म्हणजे तिच्या कुशीत बाळ येण्यासाठी,(तेही स्वतःचे नाहीच) अठरा वर्ष गेली होती.
दुर्दैव म्हणजे त्यानंतरही तिचा त्रास संपला नाही, त्या मुली मधे, काहीतरी कनजेनायटल, म्हणजे जन्मापासून असलेला पण आधी लक्षात न आलेला असा दोष होता, त्यामुळे सतत डॉक्टरच्या वाऱ्या तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.जेव्हा मी ह्या मैत्रिणीचा विचार करते तेव्हा का कोण जाणे, पण, नको ते दत्तक बित्तक मुल, आनंदापेक्षा दुखः वाढवणारं, असा विचार मनात आल्या शिवाय राहत नाही. पण दत्तक मुल घेतल्यामुळे खूप आनंदात असणाऱ्या स्त्रिया ही मी पहिल्या आहेत.
मुल दत्तक घेणे ह्याचा logical and rational असा विचार करायचा म्हंटल, तर त्यालाही लग्नाला म्हणतो तसं जुगार म्हणता येईल. नशीब चांगलं असेल तर आनंद, नाहीतर additional problem.
परदेशात मुलं दत्तक घेण्याबद्दल खूप वेगळा दृष्टीकोन आहे. तिथे स्वतःची मुलं असणारी मंडळीही मुलं दत्तक घेतात. दत्तक मुलाला ते दत्तक घेतलेलं मुल आहे ह्याची पूर्ण कल्पना असते. भारतात मात्र शेवटचा उपाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
अनाथ आश्रमात मुलं कुठून येतात? ह्याचा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा, ज्यांना आईवडील नाहीत आणि दुसरं कोणीही त्यांना सांभाळायला तयार नाही अश्या परिस्थितून, असं उत्तर आपल्याला मिळतं.
काही वेळेला मुलाचे आईवडील अपघातात गेलेले असतात. काही वेळेला नैसर्गिक आपत्ती मुळे कुटुंब दुरावलेलं असतं, काही वेळेला लग्नाआधी झालेलं, म्हणून सामाजिक भीतीने त्या बाळाला अनाथ आश्रमात ठेवलेलं असतं. ह्यापैकी आधीच्या दोन कारणांमुळे आश्रमात आलेल्या मुलांमध्ये मानसिक अस्थिरता असण्याची भरपूर शक्यता असते, आणि कुमारीमातांच्या मुलांच्या बाबतीत, ती होऊ नयेत म्हणून गर्भारपणात अनेक प्रयत्न होतात. त्यामुळे शारीरिक समस्या असण्याची शक्यता निर्माण होते.
अश्या वेळी अनाथ आश्रमातून आणलेल्या मुलांना वाढवणे, ही, अनेक वेळेला एक खूप मोठी कसोटी ठरू शकते.
मग हा जुगार खेळावा का? असा विचार मी जेव्हा करते तेव्हा, नव्या लढाईला सामोरं जाण्यापेक्षा, 'मुल नाही' ह्या सत्य परिस्थितीचा स्वीकार करणे जास्त सोपं, असं मला वाटतं.
कदाचित, मला दोन मुलं असल्यामुळे मी स्वतःला, मुल नसलेल्या आई वडिलांच्या जागी, नीटपणे ठेऊ शकत नाही, असंही असेल, पण आयुष्यात आपल्याला हवं असलेलं सगळंच आपल्याला मिळालंच पाहिजे, असं मला खरंच वाटत नाही. मला प्रामाणिकपणे मुल दत्तक घेणे हा पर्याय आई होण्यासाठीचा, खूपच कठीण पर्याय वाटतो.
आज सकाळीच ह्या मैत्रिणीशी फोन वर बोलल्यामुळे ह्या विषयावर लिहावसं वाटलं.
ह्या विषयावर आपली काय मतं आहेत हे जाणून घ्यायला खूप आवडेल. आपली प्रतिक्रिया कॉमेंट मधे अवश्य लिहा.
आई होण्यासाठी कठीण परीक्षा देणाऱ्या, अश्या सर्व स्त्रियांसाठी माझ्या मनात एक विशेष स्थान आहे, म्हणून आजच्या ह्या लेखाचा माझ्या मनातल्या गोष्टीं मधे समावेश...............

No comments:
Post a Comment