आदित्यचा वाढदिवस म्हणजे आमच्या घरात खूप गोंधळाचा दिवस. त्याला खूप मित्र आहेत. ते सगळे त्या दिवशी आमच्या घरी येतात, म्हणजे तो बोलावतो त्यांना, म्हणून येतात. थोडक्यात माझ्या भूमिकेतून सांगायचं झालं तर त्यादिवशी स्वयंपाक करून करून मी दमून जाते.
तो अनेक वेळा त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टी करता जातो. बहुतेक वेळा त्या सगळ्या आमच्या जवळच्या Mc Donald मध्ये असतात. आम्ही त्याला सोडायला जातो, तेव्हा त्या मुलाचे आई बाबा छानपैकी तिथे सर्वांना तिथे रिसीव्ह करत असतात. मला सुद्धा असं करायला आवडलं असतं,पण माझ्या लेकाला Mc Donald मध्ये पार्टी करायला आवडत नाही, म्हणजे त्याला बर्गर खायला आवडतं, तो मुद्दा नाही. पण पार्टी तिथे नाही, ती घरीच हवी. असं केल्यामुळे त्याच्या मित्रांमधला त्याचा भाव वधारतोना, म्हणून.
“Your mother is a greaaat cook.... She cooks so delicious food and presents its soooo nicely.. really professional.. असं त्याच्या मित्रांनी म्हंटलं, म्हणजे, हात गगनाला पोचल्यासारखं वाटतं त्याला. म्हणून तो मला नव्या नव्या कठीण पाकक्रिया करायला लावतो, आणी मीपण , पुत्र प्रेमाने वेडी सकाळपासून कामाला लागते. अर्थात माझी स्तुती मला आवडत नाही असं मुळीच नाही.
खरं म्हणजे हे ना, 'वासरात लंगडी गाय शहाणी' सारखं आहे. हल्ली स्वयंपाक येणे, बहुतेक कमीपणाचं वाटतं बऱ्याच बायकांना. काय ते घामट अंगानी एवढा वेळ घालवायचा किचन मधे ...प्लस किती अन्प्रोडकटिव. ह्या कामाकरता केटरर आहेत की… किंवा हॉटेल आहेत की.. त्यामुळे... जे कोणीच करत नाही, ते मी वाईट-बरं कसंही केलं तरी श्रेष्ठ ठरतं.
आम्ही सिंगापूरला राहतो. इथे माणसं सकाळच्या चहा करता किंवा कॉफी करता घराबाहेर पडतात. सगळेच नाही, पण बरेचसे लोक घरात काही शिजवत नाहीत. दिवसेंदिवस, महिनोंमहिने, वर्षोनवर्ष हि माणसं सकाळपासून रात्रीपर्यंत लागणारे सगळे जेवण बाहेर जाऊन जेवतात किंवा घरी बांधून आणतात. भारतीय लोकं घरात जेवण शिजवतात म्हणून बरेच लोक आपलं घर भारतीयाना भाडयाने देत नाहीत, स्वयंपाक केल्यामुळे किचन खराब होतं म्हणे, म्हणून भारतीय सोडून दुसर्यांना.. कमाल आहे ना ? सिंगापूर मधले काही मुलगे इंडोनेशिया किंवा थायलंड च्या मुलींशी लग्न करतात, कारण काय तर त्यांना स्वयंपाक येतो. आहे कि नाही गम्मत?
मी नोकरी करत असताना मी घरून डबा नेलेला पाहून अनेकजण आश्चर्याने म्हणायचे... oh wow!!! Home cooked food!!! Do you cook every day? आणि त्यावर आपण विचारलं त्यांना, Why? You don’t cook? कि त्या बायका म्हणायच्या, No, we don’t, because we work in office. मी मनात म्हणायची भारतात बायका बिचाऱ्या वर्षानुवर्ष घरातलं सगळं सांभाळून नोकऱ्या करतायत पण त्यांना काही दोन कौतुकाचे शब्द ऐकायला मिळत नाहीत. तिथे हे सगळं करणे, म्हणजे खास काहीतरी, आहे असं अपेक्षितच नाहीये.
आता भारतातही परिस्थिती बदलत चालल्येय म्हणा. माझ्या एका भाचीच्या लग्नाला आम्ही गेलो होतो मुंबईला, तर माझ्या वहिनीने मुलाला, म्हणजे तिच्या नवऱ्याला म्हटलं कि "आमच्या प्राचीला एवढा स्वयंपाक करता येत नाही हं". ह्यावर त्याने मला आश्चर्य वाटावं असं उत्तर दिलं, तो म्हणाला.. No worries.. आमच्याकडे बाई आहेना स्वयंपाकाला....बाई आहेना स्वयंपाकाला?????? अरे वाः!!! मजाच आहे!!! मी चाट!!!
माझं लग्न झालं तेंव्हा हा संवाद बहुदा विहिणींच्यात झाला असता आणि मुलाच्या आईने "शिकेल हळू हळू" असं उत्तर दिलं असतं. आणि माझ्या आईच्या लग्नात हा संवाद झालाच नसता.
मला नं माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवते, एक मुलगी आपल्या आई कडून पुरणपोळी करण्याची कृती लिहून घेते व मग स्वतःच्या घरी जाऊन त्याप्रमाणे पुरणपोळ्या करते. त्या काही तिच्या आईसारख्या होत नाहीत. मग ती आईला फोन करून म्हणते " आई माझ्या पोळ्या काही तुझ्यासारख्या झाल्या नाहीत ग, तू काय वेगळं करतेस"? आणखीन काही घालतेस का त्यात? तेव्हा तिची आई तिला म्हणते, "अगं आणखी काहीं वेगळं घालत नाही… माझा प्रिय नवरा आणि लाडकी मुलं खाणार म्हणून माया आणि प्रेम मात्र घालते. ते घालायची इच्छा असली कि काम जास्त निगुतीने करतो आपण, आणि मग त्या मायेच्या आणि प्रेमाच्या चवीने पदार्थाची चव जास्त वाढते".
मग हीs माया, स्वयंपाक करणारी बाई घालेल त्यात????
मनुष्य डॉक्टर असो, पायलट असो, इंजिनियर असो किंवा मजूर असो, प्रत्येकाला जेवायला हे लागतंच. मग ते स्वतः शिजवण्याचा इतका कंटाळा का? अन्न ही माणसाची मुलभूत गरज आहे. आपण सर्व कष्ट हे अन्न कमवण्या करता करतो मग तेच कुणीतरी, कसंतरी शिजवलेलं का खायचं? ह्यावर वेळ नाही हे अगदी कॉमन उत्तर आहे हल्ली... जाऊदे ....व्यक्ती तितके विचार. असो.
माझ्या मते स्वयंपाक ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाने अवगत करावी अशी आहे. त्याकरता वेळ नसेल, तर काढायला हवा, आणी कुणीतरी म्हंटलच आहे, इच्छा तिथे मार्ग. आज इतकंच. मुलं यायची वेळ झाली, त्यांच्या जेवणाचं बघायला हवं..................

No comments:
Post a Comment