Friday, 25 October 2013

Sports Day

आतिशय आनंद झाल्यामुळे मनाचं विमान आज हवेत उडतंय. एकदम मस्त वाटतंय. कशामुळे????

सांगते सांगते, कारण पण सांगते. ह्या आनंदाचं कारण आहेत, माझी अतिशय गुणी, अशी दोन मुलं. त्यांनी जर हे वाचलं ना ,तर कदाचित ती चक्कर बिक्कर येउन बेशुद्ध पडतील, कारण कौतुकं करणाऱ्या आयांच्यात माझा काही नंबर लागत नाही. पण खरंच, कौतुक करण्यासारखं काहीतरी केल्यावर त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. म्हणून आजचा लेख, मिताली,आदित्य स्पेशल.

आज मुलांच्या शाळेचा स्पोर्ट्स डे होता. गेले दोन तीन दिवस मी जरा त्याच्याच गडबडीत होते. आदित्य संचलनाच्या band ग्रुप मधे ड्रम वाजवणार होता, त्याच्यासाठी formal, white full sleeve shirt आणि formal black trousers असा वेश ठरला होता. बाकी मुलं मोठी असल्यामुळे त्यांच्या मापाचे कपडे मिळाले पण आदित्य अतिशय अडनिड्या वयोगटात असल्यामुळे मुलांच्या दुकानातला, शेवटच्या size चा shirt, त्याला लहान होत होता आणि मोठ्यांच्या दुकानातला, सगळ्यात कमी size चा shirt, त्याला मोठा होत होता.

दोन दिवस, माझं आणि त्याचं रक्त आटवत, आम्ही दोघंजणं सिंगापूरच्या कपड्यांच्या दुकानात, shirt शोधत, फिरत होतो. Shirt काही मिळत नव्हता. संचलनाच्या band मधून बाहेर व्हायची वेळ येते कि काय अशी भीती दोघानाही वाटत होती. पण आम्ही दोघांनीही कसलीही चर्चा न करता,आमची tensions, आपापल्या डोक्यातच राहू दिली आणि एक एक करून सगळ्या दुकानात Shirt शोधत फिरत राहिलो. काल संध्याकाळी, Giordano ह्या दुकानात, महागात का होईना, पण हवा तसा shirt मिळाला.

Shirt मिळाल्यावर दुकानातून बाहेर पडताना मी म्हंटलं, "चला, सुटले बाबा. मला तर टेन्शनच आलं होतं". इतक्या वेळ शांत असलेल्या आदित्यच्या डोळ्यात मला पाणी दिसलं, तो हळूच मला म्हणाला, “आई तुझ्या पेक्षा जास्त मला आलं होतं”. त्याच्या डोक्यावर एक हलकेच टप्पल दिली आणि त्याला जवळ घेतलं.

मी संयमाने वागले ह्याच्यात काहीच विशेष नाही, पण अकरा वर्षाचा छोटासा मुलगा, अजिबात panic न होता माझ्यावर विश्वास ठेऊन, माझ्या बरोबर shirt शोधत फिरला. त्याचं संयत वागणं पाहून, मी मनोमन त्याला सलाम केला.

त्याच्या संयमशील वागण्याचं खूप कौतुक वाटलं, shirt मिळायच्या आधी जर तो रडायला लागला असता तर सगळंच किती जास्त कठीण होऊन बसलं असतं! आज त्याने नवीन कपडे घालून, अगदी सुरेख, तालात ड्रम वाजवले. म्हणून दुसऱ्या कुणी देओ अगर ना देओ माझ्याकडून त्याच्या पाठीवर शाबासकिची थाप.

मितालीने तर आज अक्षरशः उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. त्यांच्या शाळेत मुलांना आणि शिक्षकांना Lake, Glacier, Spring आणि Oasis ह्या पैकी कोणच्याही एका HOUSE मध्ये add केलं जातं, आणि मग वर्षभर, त्या त्या HOUSE मधली मुलं आणि शिक्षक, त्यांच्या HOUSE करता, जास्तजास्त गुण मिळावेत, ह्या करता विविध स्पर्धांमध्ये प्रयत्न करून अधिकाधिक गुण मिळवतात. मग स्पोर्ट्स डे च्या दिवशी सर्वात जास्त गुण मि ळाल्येला HOUSE ला, त्यावर्षीची HOUSE Trophy दिली जाते.

स्पोर्ट्स डेच्या दिवशी प्रत्येक HOUSE एक Dance drill सादर करतं. ह्यावर्षी LAKE HOUSE चं dance drill मितालीनी choreograph केलं होतं. बाकी सर्व house ची drill त्यातील शिक्षकांनी choreograph केली होती.

आणि मला अत्यंत अभिमानाने हे सांगावसं वाटतंय, कि, जिथे बाकी सर्व group कोणच्या तरी इंग्लिश गाण्यांच्या तालावर हात हलवत राहिले, तिथे मिताली नी Unity In Diversity ह्या थीम वर, धीताम धीताम ( बंगाली), देवा श्री गणेशा, भांगडा आणि लुंगी Dance, ही चार भारतीय गाणी, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारत दाखवण्यासाठी वापरून, उत्तम नृत्य संचालनाचं प्रदर्शन केलं. ती स्वतः सगळ्यात मधे उत्कृष्ट नाचली. ती उत्तम नृत्यांगना आहे ह्याची कल्पना होती,पण आज, ती सुरेख नृत्य दिग्दर्शनही करू शकते, हे तिने दाखवून दिलं .इतर House चं संचलन शिक्षकांनी choreograph केलं असून सुद्धा, बक्षीस, मिताली च्या HOUSE ने पटकावलं.

स्पोर्ट्स डे च्या दिवशी कोणच्याही स्पोर्ट्स मधे भाग न घेता सुद्धा, दोन्ही मुलं यशस्वी होऊन घरी परतली.

तिच्याबरोबर माझीही collar tight झाली. ह्याचा अनुभव आधीही घेतला होता, पण आज पुन्प्रत्यायाचा आनंद प्राप्त झाला. परत एकदा Proud Mother चं फिलिंग अनुभवलं.

आणी म्हणूनच, मन पिसासारखं हलकं झालं आणि माझं विमान हवेत उडालं.....

ह्याचा तर माझ्या मनातल्या गोष्टीं मध्ये समावेश हवाच, नाही का?????

No comments:

Post a Comment